सिल्लोड नगरपरीषद निवडणुकीत चुरशीची लढत ; विद्यमान नगराध्यक्ष समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदापासून राहावे लागणार दुर

Foto
सिल्लोड नगरपरीषद निवडणुकीचे वातावरण गुलाबी थंडीत हळु हळु तापण्यास सुरुवात झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंंतिम तारीख १२ फेब्रुवारी असुन त्यामुळे उमेदवार सोमवारी व मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करतील?  या वेळेस पहिल्यांदाच नगराध्यक्ष हा थेट मतदारातुन निवडल्या जाणार असल्याने विद्यमान नगराध्यक्ष समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदापासून दुर राहावे लागणार आहे. 

अनेक वर्षांपासून नगरपरीषदेवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने  आमदार अब्दुल सत्तार यांच्या कुंंटुबातीलच नगराध्यक्ष राहीलेले आहे, परंतु या वेळी नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती प्रर्वगासाठी राखीव असल्याने आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र व विद्यमान नगराध्यक्ष समीर सत्तार यांना नगराध्यक्ष पदापासून दुर राहावे लागणार आहे, या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाच्या वतीने अँ.अशोक तायडे,विष्णु काटकर, दादाराव  वानखेडे हे इच्छुक आहे. एम. आय. एम.पक्षाच्या वतीने प्रभाकर पारधे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर काँग्रेस पक्षाकडुन राजश्री राजरत्न  निकम यांचे नाव निश्चित झाले आहे. या वेळी या निवडणुकीत पहिल्यांदा एम. आय .एम.पक्ष पुर्ण ताकदीने नगरपरीषद निवडणूकीत उतरण्याची चिन्हे दिसत असल्याने त्यामुळे निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता आहे. 

एम.आय.एम.पक्षाचे तालुका अध्यक्ष बनेखाँ पठाण यांच्या नेतृत्वाखाली सतत तीन महीन्यापासुन पक्षाने काँर्नर सभा घेऊन मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती केली आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या व्हाँट बँक समजला जाणारा मु्स्लिम व दलित समाज एम.आय.एम.पक्षाकडे वळल्याने सत्ता धारी पक्षाच्या पायाखालची वाळु सरकु लागली आहे. तरीही आमदार अब्दुल सत्तार ऐन वेळी काय खेळी खेळेल ही मात्र वेळस सांंगेल? तर आम आदमी पक्षाने सुद्धा आपले उमेदवार निवडणूक रिगंणात उतरविण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे २७ जागेसाठी होणाऱ्या निवडणूकीत शेकडो उमेदवार निवडणूक रिंगणात असण्याचे शक्यता आहे.

भाजप शिवसेना युती बाबतचे अजुन  घोंंगडे भिजत पडले आहे. तरीही भाजप-- शिवसेना यांची युती व्हावी अशी अपेक्षा भाजप शिवसेना पक्षाच्या विचारसरणीला मानणाऱ्या मतदाराची आहे. नगराध्यक्ष पदासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या उमेदवार कोण निश्चित झाले हे अद्याप कळु शकले नाही. ज्या प्रभागात उमेदवारी मागण्यासाठीची इच्छुकांशी संख्या वाढली तशा ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाची डोके दु:खी वाढली आहे. तर इच्छुकांना उमेदवारी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker